Live – राम मंदिर; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न, देशभरात दिवाळी

सियापती रामचंद्र की जय म्हणत भाषण संपूर्ण

कोरोना काळात देखील मर्यादा लक्षात ठेवणे आवश्यक आहे

आता उशीर करून चालणार नाही, हाच रामाचा संदेश आहे

मानवतेने रामाचं ऐकलं तेव्हा विकास झाला आहे

न भूतो न भविष्यती असा हा क्षण आहे

इतिहास पुन्हा अनुभवत आहे, राम-कृष्ण-छत्रपती शिवाजी महाराज काळातील लोकांनी जो अनुभव घेतला तोच आज आपल्याला येत आहे

सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा निर्णय दिला तेव्हा देखील आम्ही मर्यादेचे दर्शन होत आहे

नराला नारायण सोबत जोडण्याचा प्रयत्न आहे

मंदिर निर्माण सोबत इथलं अर्थतंत्र बदलेल, जगभरातून लोक इथे येतील

श्रीरामाचे मंदिर हे आधुनिक हिंदुस्थानचे प्रतिक, सामूहिक प्रयत्न प्रतिक बनेल, राष्ट्रीय एकतेचे प्रतिक बनेल

रामाची शक्ती पाहा, अस्तित्व मिटवण्यासाठी खूप प्रयत्न झाले पण श्रीराम आपल्या मनात वसले आहेत

राम मंदिर निर्माणसाठी ज्यांनी अर्पण आणि तर्पण केले त्या सर्वांना मी देशवासियांकडून नमस्कार करतो

स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले, तेव्हा 15 ऑगस्टला स्वप्न पूर्ण झाले

तुटणे आणि पुन्हा उभे राहणे या क्रमातून राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे

अनेक शतकांचं स्वप्न पूर्ण होत आहे

संपूर्ण हिंदुस्थान राममय झाला आहे, भावुक झाला आहे

या ऐतिहासिक क्षणासाठी मला येथे बोलवले या करता आभारी आहे

आज हा जयघोष फक्त अयोध्येत नाही तर जगभरात सुरू आहे

सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणास सुरुवात

राम मंदिर पोस्ट तिकिटाचे अनावरण

 

हे मंदिर उभे राहण्याआधी मनात मंदिर उभे राहिले पाहिजे

आत्मनिर्भर हिंदुस्थानची ही सुरुवात आहे

श्रध्येय लालकृष्ण अडवाणी हे देखील आज घरातून हा सोहळा पाहत असतील

मंदिर निर्माणासाठी अनेकांनी बलिदान दिले

बऱ्याच वर्षांपासून पाहिलेलं स्वप्न पूर्ण

सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण

राम मंदिराच्या वास्तूची प्रतिकृती तयार आहे, लवकरच मंदिर उभे राहील

राम भक्तांच्या आनंदाला पारावर उरला नाही, अनेक शतकांचे स्वप्न पूर्ण होत आहे

न्यायपालिकेचे मानले आभार, न्यायपालिकेवरील विश्वास दृढ झाला आहे

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भाषणास सुरुवात

या विशेष सोहळ्यासाठी 175 आमंत्रित लोक उपस्थित

भूमिपूजन सोहळा संपन्न, आयोध्येसह देशभरात दिवाळी, जय श्रीराम जयघोष

राम जन्मभूमी येथे भूमिपूजन सुरू, मंत्रपठण करून विधिवत पूजा

राम जन्मभूमी परिसरात पंतप्रधान मोदी यांनी पारिजात वृक्ष लावला

पंतप्रधान मोदींनी प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती समोर साष्टांग नमस्कार केला

पंतप्रधान मोदींचा ताफा राम मंदिर भूमिपूजन स्थळावर पोहोचला

पंतप्रधान मोदींनी हनुमान गढी येथे हनुमानाचे दर्शन घेतले, मोदी यांच्या डोक्यावर पगडी आणि चांदीचा मुकुट घालण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा हनुमान गढीच्या दिशेने निघाला

सोशल डिस्टन्स पाळून केले मोदींचे स्वागत

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले

पंतप्रधान मोदी हेलिकॉप्टरने अयोध्येत दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौ येथे पोहोचले, थोड्याच वेळात अयोध्येला रवाना होणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, माजी केंद्रीय मंत्री उमा भारती अयोध्येत दाखल

एक मोठा लढा आज शांत होणार, आजचा दिवस ऐतिहासिक, अध्यात्मिक गुरू, साधू संतांनी व्यक्त केल्या भावना

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेले राममंदिर निर्मितीचे स्वप्न साकार होत आहे

शरयूच्या तीरावर शिवसेनेचा दीपोत्सव

 

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालय परिसरात रांगोळ्यांची सजावट

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्ली येथून अयोध्येला रवाना

 

अयोध्या येथे भूमिपूजन सोहळ्याआधी सर्व परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे,कोविड19 चे सर्व नियम पालन करण्यात येत आहे.

ayodhya-covid-19-protocol-new

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन

. हनुमान गढी येथे पंतप्रधान मोदी यांचा विशेष सन्मान करण्यात येणार

. राम मंदिर भूमिपूजन दिनानिमित्ताने संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण

आपली प्रतिक्रिया द्या