
गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा भवन, त्याची संकल्पना यांबाबत उपस्थितांशी संवाद साधला. त्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
- मराठी भाषेचं मंदिर हे छत्रपतींच्या मातृभाषेचं मंदिर आहे. तिथे कोणतीही उणीव राहता कामा नये.
- छत्रपतींच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा तळपली पाहिजे. ते तेज कायम ठेवण्याच्या दृष्टिने आज टाकलेलं पाऊल महत्त्वांचं आहे.
- मराठी भाषेच्या राज्यामध्ये जर मराठी भाषेचा ठसा पुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला अक्कल शिकवण्याची ताकदही मराठीत आहे.
- प्रत्येक प्रांतानुसार माझ्या महाराष्ट्राची मराठी आहे. त्यावर कुणाला पोटदुखी होत असेल
- या राज्यात मराठी भाषा शिकणं हा अत्याचार नाही तर ती आवश्यकता आहे.
- सीमाभागात होणारे भाषिक अत्याचार चालू देणार नाही.
- आमची भाषा कुणावर आक्रमण करणार नाही, आणि दुसऱ्या भाषेचं आक्रमणही आपल्यावर नको हे महाराजांचं धोरण होतं.
- पण महाराजांनी तो शब्द काढून स्वस्ति श्री अमुक अमुक असा शब्द टाकायला सुरुवात केली.
- उदाहरणादाखल सांगायचं झालं तर पूर्वी राजकीय पत्रांवर हुकूमत पनाह असा शब्द असायचा
- म्हणूनच आपण म्हणतो की भाषा ही संस्कृती आहे.
- आपण आज त्यांच्यामुळेच इथे आहोत. ते नसते तर आपण आज इथे नसतो.
- तो सुद्धा या मराठी भाषा भवनात असला पाहिजे.
- आपल्या कारभाराची भाषा ही स्वभाषाच असली पाहिजे हे जाणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यव्यवहार कोष तयार करायचा आदेश दिला होता.
- आपल्या कारभाराची भाषा ही कळणाऱ्या मराठीत असली पाहिजे, हा माझा आग्रह आहे.
- ही ताकद दुर्दैवाने आपण ओळखत नाही, हे आपलं दुर्भाग्य
- इंग्रजांच्या डोक्यात मराठी गेली आणि परिणाम म्हणून लोकमान्यांना कारावास झाला, ही मराठीची ताकद आहे.
- पण, इंग्रजांच्या काळातही सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, हा अग्रलेख लोकमान्य टिळकांनी मराठीतच लिहिला होता.
- लवकरच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होईल. त्यापूर्वी इंग्रजांचा काळ होता.
- आता मराठी भाषा भवन होत आहे. मराठी रंगभूमीचा वारसा दाखवणारं दालनही लवकरच आपण तयार करत आहोत.
- यात दुसऱ्या भाषेचा द्वेष नसून आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड असता कामा नये, हा त्यामागचा उद्देश आहे.
- जास्तीत जास्त भाषा शिकणं हा काही गुन्हा नाही
- घरात आई-बाबा हेच म्हटलं पाहिजे. म्हणून माझी मुलं मराठी हिंदी इंग्रजी बोलतात
- ती इंग्रजी शाळेतच शिकली आहेत. पण शिवसेनाप्रमुखांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की इंग्रजी शाळेमध्ये आणि मराठी घरामध्ये.
- हे मराठी मराठी करतात आणि यांची नातवंडं इंग्रजी शाळेत जातात, अशी टीका शिवसेनाप्रमुखांवर झाली होती.
- आमच्यावर नेहमी टीका होत असते. मी टीकेला किंमत देत नाही.
- मराठी भाषेवर बोलण्यापेक्षा मराठी भाषेत बोला
- ही वेळ आपल्यावर कोणी आणि का आणली याचा विचार आपण केला पाहिजे
- मला दुसऱ्या भाषेचा द्वेष नाही. पण आपल्या राज्यात मराठी भाषेची सक्ती करण्याचा कायदा करावा लागतो.
- मराठी भाषेचं वैभव, भाषेची समृद्धी, श्रीमंती त्याला इथे आल्यावर कळली पाहिजे.
- मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक हा न चुकता इथे आलाच पाहिजे.
- त्याचप्रमाणे आपल्या मातृभाषेच्या मंदिरालाही जगभरातून लोकांनी भेट दिली पाहिजे.
- आपण जे करतोय ते जगातलं सर्वोत्तम असलं पाहिजे.
- जीएसटी भवनाचीही भरारी आपण आज घेतली आहे.
- मघाशी जीएसटी भवनावेळीही चर्चा होत होती. चर्चेशिवाय जशी सुरुवात नाही. तशी ती सुरुवात मराठी भाषा भवनाची झाली आहे.
- हे मला किती जन्मांचं पुण्य लाभलं आहे, त्याच हिशोब मी करणार नाही.
- आणि आज तिथेच माझ्या आजोबांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा मुलगा म्हणून मुख्यमंत्रीपदापुढे माझं नाव लागलं यापेक्षा आयुष्याचं सार्थक ते कोणतं असेल
- मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले, मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेने केलं
- त्यांच्या सोबतीला तेव्हा शिवसेना नसली तरी शिवसेनाप्रमुख हे एक व्यंगचित्रकार म्हणून काम करत होते.
- माझे आजोबा त्या लढ्यात अग्रेसरांपैकी एक होते.
- जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही.
- महाराष्ट्राला मुंबई ही झगडून, संघर्ष करून, रक्त सांडून मिळवावी लागली हा इतिहास आहे.
- जेव्हा देशात प्रांतवार राज्यांची रचना झाली, भाषावार राजधानी मिळाली तेव्हा महाराष्ट्राला ही राजधानी सहज मिळाली नाही
- मराठी माणसाच्या आयुष्यात संघर्ष हा आलाच.
- आयुष्यातल्या काही जबाबदाऱ्या पार पाडताना आयुष्याचं सार्थक झालं असं वाटतं, त्यातली ही एक घटना आहे.
- आज आपण अशा मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन करत आहोत त्याचा तर मला आनंद आहेच
- मराठी भाषा भवन हा बोली भाषेतला शब्द असला तरी आपली भावन माझ्या मातृभाषेचं मंदिर अशी आहे.
- आजचा हा गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आपल्या मातृभाषेचं मंदिर उभं राहत आहे – मुख्यमंत्री
- मराठी भाषेसंदर्भात ते उपस्थितांशी आणि जनतेशी संवाद साधत आहेत
- या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत.
- मराठी भाषा भवन भूमिपूजन सोहळा मुंबईत संपन्न होत आहे.


























































