
सामना ऑनलाईन । मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असून पूरपरिस्थितीता पाहणी केली. आज त्यांनी हवाई पाहणी देखील केली. तसेच पूरग्रस्तांची भेटही घेतली.
- बोटीत पाणी शिरल्याने दुर्घटना झाल्याची प्राथमिक माहिती – फडणवीस
- ब्रह्मनाळमध्ये दुर्घटना झालेली बोट खासगी, बोटीत प्रमाणापेक्षा जास्त लोक होती – फडणवीस
सांगलीतील ब्रम्हनाळ येथे बोट उलटून 14 जणांचा मृत्यू, सात जण बेपत्ता
- काही भागात दोन महिन्यांचा पाऊस दोन दिवसात पडला – फडणवीस
- ‘राष्ट्रीय आपत्ती’ गजर भासल्यास घोषित करू, मात्र राष्ट्रीय आपत्तीत जी मदत केली जाते ती सुरुय – फडणवीस
- महाजनादेश यात्रेचा पहिला टप्पा रद्द करण्यात आला
Photo- सांगली,कोल्हापुरातील पूरपरिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
- केंद्र सरकारने सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन दिले
- गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा सुरू – फडणवीस
- आलमट्टी धरणातील विसर्ग कमी करण्याचा कर्नाटकचा निर्णय – फडणवीस
- पेट्रोल, डिझेलचीही टंचाई, परंतु आधी सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यास प्राधान्य – फडणवीस
- कोल्हापुरात 67 हजार हेक्टरवरील पिकं नष्ट – फडणवीस
- 2 लाख ग्राहकांची वीज बंद आहे, पाणी ओसरल्यावर काम सुरू होईल – फडणवीस
- 390 पाणी पुरवठा योजना बंद – फडणवीस
- मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर
- कोल्हापुरात पुरामुळे 4 व्यक्तींचा मृत्यू – फडणवीस
- पंजाब, गोवा, गुजरातमधून बचावपथकं मागवण्यात आली आहे – फडणवीस
- 60 बोटींमार्फत बचावकार्य सुरू – फडणवीस
- 152 ठिकाणी 38 हजार लोकं विविध कँम्पमध्ये किंवा नातेवाईकांकडे गेले आहेत
- नागरिकांना एअर लिफ्ट करण्याचाही प्रयत्न सुरू – फडणवीस
- अडकलेल्या सर्वांना सुखरूप वाचवण्याचे प्रयत्न सुरू
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा, आटमट्टी धरणाचा विसर्ग 5 लाख क्युसेकपर्यंत वाढवणार – फडणवीस
- आलमपट्टी धरणाच्या बॅक वॉटरमुळे पूरपरिस्थिती – फडणवीस
Maharashtra Chief Minister’s Office: Maharashtra CM Devendra Fadnavis spoke to Karnataka CM BS Yediyurappa who agreed to release 5 lakh cusecs water from Almatti Dam in Karnataka. This will help to bring down the water level in Sangli, Maharashtra. (File pics) pic.twitter.com/aUTcP3OTND
— ANI (@ANI) August 8, 2019
- नेव्हीच्या 5 टीम, एनडीआरएफच्या 2 टीम आणि आणखी दोन टीम सांगलीकडे रवाना
- हवामानामुळे सांगलीतील दौरा करावा लागला – फडणवीस
- सांगलीतील परिस्थिती अतिशय गंभीर – फडणवीस
- अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, कराडमध्ये भीषण पूरपरिस्थिती झाली – फडणवीस
- कोल्हापूर पूर परिस्थितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis visited Shivaji Nagar area in Kolhapur to review rescue & relief operations. CM also met flood-affected people staying at Kalyani Hall in Kolhapur, today. #Maharashtra pic.twitter.com/KuyBnBnXsx
— ANI (@ANI) August 8, 2019





























































