
- होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक डॉक्टरांचीही मदत फिवर क्लिनिकसाठी घेण्यात येत आहे
- कोणत्याही परिस्थितीत शेती, कृषिमालावर कोणतंही बंधन नाही, बी बियाणं, खतं यांच्यावर कोणतीही बंधन नाहीत. मालवाहतूक मोकळी केलेली आहे
- रेड झोन मध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे आणि नागपूरमधील काही ठिकाणे
- जर ते वाचले तर अर्थचक्राचा गाडा चिखलातून काढून पुढे ढकलू शकतो
- लॉकडाऊन नंतर काय हा प्रश्न आहेच. पण राष्ट्र आणि राज्याची खरी संपत्ती ही जनता आहे.
- लॉकडाऊन नंतर काय हा प्रश्न आहेच. पण राष्ट्र आणि राज्याची खरी संपत्ती ही जनता आहे.
- अनेक ठिकाणी फिवर क्लिनीक सुरू करण्यात आले आहेत.
- लवकर उपचार झाले तर वयाच्या कोणत्याही टप्प्यावरचे रुग्ण बरे होऊन घरी परतत आहेत.
- अनेक खासगी संस्था, क्लिनिक यांनी पुढे येणं गरजेचं आहे.
- कोविड योद्धा आवाहनाला हजारोंचा प्रतिसाद. त्यातील काहीजणांना प्रशिक्षण देऊन तयार करत आहोत
- मुंबईच्या आणि कल्याण डोंबिवलीच्या महापौरही ज्या पूर्वी परिचारिका होत्या, त्यांही सेवा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.
- रुग्णांची चाचणी करण्यात आली आहे. दोन लाख तपासण्यांनंतर 272 जणांना ऑक्सिजनची कमतरता आणि अन्य आजार असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यांच्यावर पालिकेकडून सर्वतोपरी उपचार करण्यात येत आहेत.
- घराघरात जाऊन, विशेषतः झोपडपट्ट्यांमध्ये ऑक्सिमीटर द्वारे तपासणी सुरू आहे
- जेवढे रुग्ण येत आहेत, त्यातील बहुतांश अतिसौम्य किंवा सौम्य प्रकारातील आहेत. त्यांना विलगी करण कक्षात ठेवून उपचार करण्यात येत आहेत.
- या सर्वांवर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
- वाढणाऱ्या आकड्यांमधील जास्तीत जास्त रुग्ण हे आधीच्या रुग्णांच्या सहवासात येऊन संक्रमित झालेले आहेत.
- लॉकडाऊन नसता तर विषाणूंचा गुणाकार झपाट्याने वाढला असता.
- सिंगापूरच्या पंतप्रधानांनी याला सर्किट ब्रेकर म्हटलं आहे. विषाणूंची शृंखला तोडणारा गतिरोधक म्हणजे लॉकडाऊन
- सिंगापूरच्या पंतप्रधानांनी याला सर्किट ब्रेकर म्हटलं आहे. विषाणूंची शृंखला तोडणारा गतिरोधक
- लॉकडाऊन म्हणजे टाळेबंदी नाही, तर गतिरोधक
- या अशा महाराष्ट्राचा मी तुमच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री आहे
- सत्तावीस वर्षं औरंगजेब महाराष्ट्राशी झुंजला पण यशस्वी होऊ शकला नाही, इतका चिवट, झुंजार महाराष्ट्र आहे.
- हा महाराष्ट्र आधुनिकतेकडे जाणारा आहे, देशाला दिशा दाखवणारा आहे.
- महाराष्ट्राला साधुसंतांची, राष्ट्रपुरुषांची, लढवय्यांची परंपरा आहे. कोणतंही असं क्षेत्र नाही, जिथे महाराष्ट्रात उणीव आहे.
- महाराष्ट्राच्या पराक्रमाच्या गाथा शतकांची आहे.
- महाराष्ट्राने मनात आणलं तर तो काहीही करू शकतो, तोच महाराष्ट्र आज कोरोनाविरुद्ध लढायला सज्ज आहे
- तिथेही आपण प्राथमिक आरोग्य केंद्र, अनेक बेड्स असलेलं केंद्र उभं करत आहोत.
- अवघ्या बारा तासांत 25 हजार रक्तदात्यांनी रक्तदान करून विश्वविक्रम प्रस्थापित केला होता, तो आजही आपल्या नावावर आहे.
- गोरेगाव येथे एक्झिबिशन मैदानावर एक रक्तदानाचा विश्वविक्रम केला होता.
- आणि आज त्याला दहा वर्षं पूर्ण होत असताना त्याच मैदानावर कोरोना ग्रस्तांसाठी पॅव्हेलियन उभारण्यात येत आहे.
- दीदी, हृदयनाथजी, उषाताई, अनिल मोहिले यांच्या सह लाखों लोकांसोबत ते गाणं गायलं होतं.
- मी 2010 सालीही लतादीदींना हे गाणं म्हणण्याची विनंती केली होती. सेकंदाचाही उशीर न लावता दीदी त्याला हो म्हणाल्यात
- 1960 साली शिवतीर्थावर एक मे रोजी लता दीदींनी बहु असोत सुंदर हे गाणं गायलं होतं.
- जेव्हा हा सोहळा साजरा करण्याचं ठरवलं तेव्हा सहज एक कल्पना आली.
- मी 1960च्या गोष्टी करणार नाही. पण मला 2010चा सुवर्ण महोत्सवी दिवस मला आठवत आहे. सर्वांनाच तो आठवत असेल. त्या दिवशी लाखो लोकं बीकेसी येथे जमली होती. त्या दिवशी तिथे शिवसेनाप्रमुख होते, बाबासाहेब पुरंदरे होते. विशेष म्हणजे लता दीदीही होत्या. त्यांनाही माझे वंदन
- जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा महाराष्ट्राचा हीरक महोत्सवी दिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचं मनात होतं. पण आज तशी परिस्थिती नाही.
- या लढ्यात योगदान देणाऱ्या ज्ञात आणि अज्ञातांना मानाचा मुजरा
- आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन एकाच दिवशी आहे. कामगारांनी पराक्रमाची शर्थ करून मुंबई मिळवून दिली.
- त्यांना आणि जिने आमचं घर सांभाळलं त्या ‘मां’ यांना मी वंदन करतो
- सेनापती बापट, शाहीर अमरशेख हेही त्यावेळी घरात येत असतं.
- या तिघांची तर मला आठवण आलीच, पण त्यावेळी घरात अनेक जण येत असत. लढ्याची दिशा ठरवली जात होती.
- ज्या लढ्यात माझे आजोबा, शिवसेनाप्रमुख, माझे काका यांच्यासह माझं घराण सहभागी होतं. ती चळवळच होती.
- ज्या हुताम्यांनी मुंबई, महाराष्ट्रासाठी बलिदान दिलं, त्यांना मी त्याच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून वंदन करत होतो
- हुतात्मा चौकात मी अनेकदा गेलो आहे, पण आज क्षणभर रोमांच उभे राहिले
- आज सकाळीच मी हुतात्मा स्मारकाला वंदन करून, मंत्रालयात ध्वजारोहण करून आलो.
- बलिदान करून मुंबई मिळवलेली आहे
- हे स्वातंत्र्य असंच मिळालेलं नाही. त्याच्या आठवणी आजोबा आणि वडिलांकडून ऐकल्या आहेत तो काळ संघर्ष आणि लढ्याचा होता महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेतली, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्म्यांना वंदन
आज महाराष्ट्र दिन, राज्यात सोशल डिस्टनसिंग पाळून जिल्ह्या जिल्ह्यात ध्वजारोहण



























































