LIVE: मराठा आंदोलन – बुधवारी मुंबई, नवी मुंबई बंदची हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज बांधवांनी ठोक मोर्चा आंदोलन सुरू केलं आहे. सोमवारी कायगाव येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळते.

मराठा आंदोलनाचे सर्व अपडेट:

  • हिंगोली नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आली
  • कायगाव येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल काडगावकर यांचा हृदयविकाराने मृत्यू
  • नगर-संभाजीनगर-पुणे महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
  • वाचा सविस्तर बातमी: हिंगोलीत पोलिसांची गाडी पेटवली, वसमतला दगडफेक
  • नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आज आंदोलन करण्यात आले, यावेळी सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले
  • संभाजीनगरमध्ये जगन्नाथ विश्वनाथ पाटील-सोनवणे (वय-६०) यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी विष घेतलं
  • शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी मराठा बांधवांच्या भावना लोकसभेच्या सभागृहात मांडल्या
  • शिवसेना खासदारांनी मराठा आंदोलनाचा मुद्दा लोकसभेत मांडला
  • वाचा सविस्तर बातमी: आमदार प्रशांत बंब तुम्ही कुठे आहात? मराठा आंदोलकांचा रोष
  • पाहा फोटोगॅलरी
  • वाचा सविस्तर बातमी: हिंगोलीत एसटी सेवा बंद
  • वाचा सविस्तर बातमी: जामखेड येथे सकल मराठा समाजाचे रास्तारोको आंदोलन
  • पुणे-संभाजीनगर महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको, पैठण आणि शेवगाव मार्गे वाहतूक वळवली
  • वाचा सविस्तर बातमी: आंदोलन तीव्र… आणखी एका मराठा युवकाची नदी पात्रात उडी
  • मराठा आरक्षण प्रश्नावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका मांडण्यासाठी तातडीची पत्रकार परिषद 
  • सकल मराठा समाजाच्या वतीने पाथर्डी येथे आंदोलनाला सुरुवात, रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे
  • धाराशिव येथे मराठा समाजाचे आंदोलन
  • नगर शहरांमध्ये सकल मराठा समाजाच्यावतीने काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, हुतात्मा स्मारकापाशी मराठा बांधव एकत्र जमले
  • नगरमध्ये आंदोलनाचे पडसाद
  • वाचा सविस्तर बातमी: बीड जिल्ह्यात कडकडीत बंद
  • कायगावमध्ये वातावरणात प्रचंड तणाव
  • आग विझवण्यासाठी आलेल्या जवानांवर कुदळ-फावडी फेकली
  • पेटवलेल्या अग्निशमनच्या गाडीचा स्फोट
  • संतप्त जमावाने अग्निशमन दलाची गाडी जाळली
  • जमावाने पोलिसांच्या तुकड्यांवर केली दगडफेक
  • कायगावमध्ये आंदोलक पुन्हा आक्रमक
  • संभाजीनगरमध्ये इंटरनेट सेवा बंद, अफवा पसरू नये म्हणून प्रशासनाने घेतला निर्णय
  • चौकाचौकात मराठा आंदोलन झाले
  • संभाजीनगरमध्ये आंदोलक रस्त्यावर, तरुणांची संख्या अधिक
  • मराठवाड्यात आंदोलनाची तीव्रता अधिक
  • राज्यात ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर
  • अंत्यसंस्कारावेळी कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना येणास मनाई
  • ज्या ठिकाणी शिंदे यांनी जलसमाधी घेतली त्याच परिसरात केले अंत्यसंस्कार
  • वाचा सविस्तर बातमी: मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार
  • काकासाहेब शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
  • शिंदे कुटुंबीयांच्या मागण्या मान्य
  • राज्यभरातून मराठा आंदोलक कायगावकडे निघाले