आम्ही युद्धाची तयारी करत नाही! पाकिस्तान घाबरले; नेटकऱ्यांनी झोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
asif-ghafoor

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आम्ही युद्धाची तयारी करत नसून हिंदुस्थानच आमच्यावर युद्ध लादत आहे, असा फुटकळ दावा केला आहे. तसेच आम्ही तर केवळ हिंदुस्थानचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज होत आहोत, अशी माहिती पाकिस्तानी लष्कराचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. पाकिस्तानच्या लष्काराने समोर येऊन अशा प्रकारे माहिती देणे यावरून पाकिस्तान घाबरला असल्याचे स्पष्ट होत आहे.

याआधी बांगलादेशची निर्मिती हा एकप्रकारचा दहशतवाद असल्याचा अजब दावा पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात आला आहे. तसेच पाकिस्तानच्या दृष्टीने महत्वाचे प्रोजेक्ट समोर असतानाच हिंदुस्थानकडून असे आरोप केले जातात. पुलवामावेळी देखील असेच झाले असल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यावेळी परिस्थिती सारखीच आहे. आम्ही विकासाच्या दृष्टीने पाऊल टाकत असताना हिंदुस्थानकडून अडथळे निर्माण केले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच निवडणुकींवर डोळा ठेवून पाकिस्तानला निशाणा करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पाकिस्तानच्या लष्कराकडून करण्याता आलेल्या या दाव्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्विटरवर झोडून काढलं आहे.