Live – गद्दारांचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रातून पळवून लावायचंय, आदित्य ठाकरे यांचा घणाघात

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे नाशिक येथे मेळावा घेत निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधत आहे.

  • गेली सहा महिने मी त्यांना सांगत आहे की चाळीस गद्दारांनी राजीनामा द्यावा. मी स्वत: राजीनामा देतो व आता निवडणूका घ्या. एकही गद्दार निवडून येणार नाही. काही दिवसांपूर्वीच एक सर्व्हे आलेला आहे. त्यात स्पष्ट सांगितलंय की आता निवडणूका झाल्या तर महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार.
  • हिंदुत्वाचं नाटक करायचं. प्रभादेवीत गणपतीच्या विसर्जनाच्या ठिकाणी गोळीबार करायचं हे यांचं हिंदुत्व का? शिवसेनेचं हिंदुत्व स्पष्ट आहे. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारं हिंदुत्व आहे. औरंगाबादचं नाव संभाजीनगर केलं. उस्मानाबादचं नाव धाराशीव केलं. पण कुठेही दंगल झाली नाही. आपलं हिंदुत्व स्पष्ट आहे. मनात राम हाताला काम हेच आपलं हिंदुत्व आहे.
  • नाशिकमध्ये एकतरी खांब लागला का मेट्रोचा. सहा हजार कोटी मिळणार होते ना. काय झालं त्यांचं
  • उद्धव ठाकरे हे पहिले मुख्यमंत्री आहेत जे तीन वेळा अयोध्येला गेले. आम्ही सत्तेत असताता तिरुपती मंदिराला जागा दिली. या गद्दारांच्या सरकारने त्या निर्णयालाही स्टे दिला आहे. त्यांनी मंदिरालाही महाराष्ट्रात येऊ दिलेलं नाही.
  • आर्थिक नियोजन करताना जनतेचा पैसा कसा वाचावयाचा. ते शिकलेलो आहे. मुंबईकरांचा शिवसेनेवर विश्वास आहे तसा यंदा नाशिककरांचा विश्वासही आपल्यावर बसणार म्हणजे बसणारच.
  • मुंबई व नाशिकमध्ये घोटाळ्यांवर घोटाळे होत चालले आहेत. शेवटचे महापौर जाऊन वर्ष होऊन गेलं. त्यामुळे सर्व शहारांवर मुख्यमंत्र्यांचं राज्य चाललंय. मुख्य़मंत्र्यांचं राज्य म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरांचं व मित्रांचं राज्य चाललं आहे.
  • आपले मुख्यमंत्री डाव्होसला गेलेले. गेल्या वर्षी मी गेलेलो तेव्हा चार दिवसात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली. मुख्यमंत्री 28 तास तिथे होते. 40 खोके खर्च केले. पण त्यातून तुम्हााल काय मिळाले.
  • एका माणसाच्या राक्षसी महत्वकांक्षेसाठी जी गद्दारी केली. त्याने अख्ख्या महाराष्ट्राला डुबवलं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला ते मागे घेऊन चाललेले आहेत. अडीच वर्षात आर्थिक संकट होतं. त्या आर्थिक संकटातही साडे सहा लाख कोटींची आर्थिक गुंतवणूक आपण आणली. हे उद्धव ठाकरेंवर विश्वास होतो म्हणून ते महाराष्ट्रात आले. पण सरकार बदलल्यानंतर उद्योग सर्व गुजरातला गेले. सर्व उद्योग गुजरातला गेले व चाळीस आमदाराही गुजरातला गेलेले. .या चाळीस गद्दारांसाठी आपल्या रोजगाराच्या पाच मोठ्या संध्या गुजरातकडे गेल्या,
  • नाशिकचा विकास आपण कसा करणार ते आताच ठरवलेला पाहिजे. आर्थिक नियोजन कसं करणार त्याचा विचार केला पाहिजे. आम्ही मुंबईत कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टनंतर मोठा कर लावलेला नाही. तसं मला मुंबईत करायचं आहे. मुंबई सारख्या शहरात पाच किलोमीटर पाच रुपयात जाऊ शकता. दहा किलोमीटर दहा रुपये. मग इथे हे 29 रुपये कशाससाठी लावतात. हे कुणासाठी करतात. कुठल्या मित्रांसाठी करतात.
  • 1997 मध्ये शिवसेना जेव्हा महापालिकेत सत्तेत आली. तेव्हा उद्धव साहेबांनी स्वत: लक्ष घातलं. तिथे तोटा ६०० कोटींचा होता. त्यानंतर आर्थिक नियोजन करून 90 हजार कोटींच्या ठेवी आपण केलेल्या आहेत. या ठेवी नसुत्या पडलेल्या नाही. ते पैसे आपण मोठ्या प्रोजेक्टसाठी वापरतो. त्यावेळी नागरी विकास मंत्र्याशी मी चर्चा करायचो. तेव्हा ते मला सांगायचे की मुंबई सोडलं तरी कुठल्याच महापालिकेकडे ठेवी नाहीत. सगळे तोट्यात चाललेले आहे. स्थानिक राजकारण असतं त्यांचं फ्युचर व्हिजन नसतं. फक्त पैसे उधळायचं माहित असतं.
  • मी अनेक वर्ष नाशिकमध्ये आलेलो आहे. गेली 10 वर्ष नाशिकमधली होती जी कुठे ना कुठे हरवलेली होती. ब्ल्यू प्रिंट हरवली, नंतर दत्तक घेतलेली त्याचं काय झालं माहीत नाही. आपण एका शहराची दहा वर्ष वाया घालवली.
  • मी तुम्हाला दुसरं चँलेंज दिलं असतं. तुम्ही तुमचा राजीनामा द्या. ठाण्यात मी तुमच्यासमोर लढायला आलो असतो. मग बघू काय होतो. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे व तो शिवसेनेचाच राहणार.
  • एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही मला फोन करू सांगितलं असतं मला वरळीतून लढायला जमणार नाही तर मी तुम्हाला दुसरं चॅलेंज दिलं असतं.
  • माझ्या रक्ताने मला कधी जात पात मानायला शिकवलं नाही. मला माझ्या आजोबांनी शिकवलं की पैसा येतो जातो. नाव गेलं तर ते परत येत नाही. त्यामुळे ते नाव मी जपत चाललो आहे.
  • मी मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे की राजीनामा द्या व वरळीतून माझ्यासमोर निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा. माझ्य़ाकडे ना केंद्र सरकार आहे ना पोलीस यंत्रणा आहे. माझ्याकडे काहीच नाही. मी साधा आमदार आहे. पण त्यांची काही हिंमत झाली नाही. त्यांनी देशभरातील जी भाजपची आयटीसेल आहे. त्यांना सांगितलं की आदित्य ठाकरे यांना शिव्या द्या. पण जेवढ्या शिव्या दिल्या तेवढं मला बरं वाटतंय. आपण काहीतरी योग्य करतोय हे समजतंय. मी कधी शिवी दिली नाही कारण माझ्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं रक्त आहे.
  • आपल्याकडे लोकं येतात. गर्दी होते. दुसरीकडे खोके वाटून वाटून खोके रिकामी झाले तरी त्यांच्याकडे लोकं येत नाही. कुठेही गेले तरी तिच कॅसेट चालवतात. कुठेही गेले तरी तेच तेच बोलतात. पण अजूनही महाराष्ट्राला काय दिले ते सांगू शकलेले नाही.
  • जिथे जिथे मी जातो मला अनेक लोकं सांगतात आदित्य थँक्यू. तुझ्या वडिलांनी आमचा जीव वाचवला,. कोरोना काळ हा भयंकर होता. देशातील एकमेव मुख्यमंत्री होते जे जी परिस्थिती होती पारदर्शकपणे आमच्यासमोर मांडत होते.
  • मी लोकांचे प्रेम घेत फिरत आहे. उद्धव साहेबांच्या पाठित चाळीस वार झाले असतील. तरिही उद्धव साहेब सामान्य माणसांचा आवाज बुलंद करत आहेत.
  • यांचं गलिच्छ राजकारण आपल्याला महाराष्ट्रातून पळवून लावायचं आहे, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
  • एवढं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने कधी पाहिलेले नाही. हे कुणाला पटणारं नाही. तुमचे राज्यकर्ते खोके घेऊन सुरत गुवाहटीला पळणारे असतील. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर, महिलांवरील अत्याचारावर शांत बसणारे असतील तर ते लोकांना पटणारे नाही.
  • गेल्या सहा महिन्यात खोकेवाल्यांच्या सभा बघा व आपल्या सभा बघा. प्रत्येक ठिकाणी लोकं स्वत:हून येतात व सांगतात की आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. काल पेट्रोल पंपावर उभा असताना दोन बायका आल्या व त्यांनी सांगितलं की आम्ही शिवसैनिक नाही. पण आता आम्ही शिवसेनेलाच मतदान करणार. कारण उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे काम केलं त्यामुळे लोकं त्यांची फॅन झाली आहेत
  • मविआचं सरकार स्थापन झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा यांना आनंद व्हायला हवा होता. आम्ही बाळासाहेबांना मानतो उद्धव ठाकरेंना मानतो म्हणता. मग त्यांच्या बद्दल तुम्हाला प्रेम आदर नाही वाटला का. त्यांच्याच पाठीत खंजीर खुपसताना तुम्हाला काही वाटलं नाही का. पण आनंद न होता हे डरपोकासारखे सुरतेला पळाले.
  • या गद्दारांपैकी एकही उठून बोललेला नाही की मी खोक्याला हात लावलेला नाही. काय परिस्थिती आली आहे. आपले राज्यकर्त्यांनी स्वत:ला विकून टाकलं व उ्डया मारून तिथे गेले.
  • गद्दारी केल्यापासून या गद्दारांचं त्यांच्या मतदारसंघात जाणं कठिण झालं आहे. 50 खोके एकदम ओके हे घोषणा गेली आठ महिने चालू आहे.
  • हे गद्दार असं सांगू शकतात का, ते सांगू शकतात का आम्ही 50 खोक्यांना हात लावलेला नाही.
  • गद्दारी झालेली आहे ती कुणालाच पटलेली नाही. मी ज्या ज्या ठिकाणी गेलो तिथे हेच सांगितले की मी आतापर्यंत लोकांची फक्त सेवाच केलेली आहे. कुणाच्या पाठीत खंजीर खुपसलेला नाही.

– संपूर्ण महाराष्ट्रात मविआने गरुडझेप घेतली आहे. मविआसोबत महाराष्ट्र उभा आहे. हे चित्र सगळीकडे दिसत आहे. मी गेली सहा सात महिने सगळीकडे जाऊन सांगतोय की आज निवडणूका घ्या, बघू कोण जिंकतंय

– महाराष्ट्रात असं पेटलेलं आहे की निवडणूक आता झाली तर एकच रंग दिसेल, भगवा भगवा भगवा. काही लोकांना प्रश्न पडेल की कोणत्या गटाचा भगवा. पण हे गट वगैरे काही नाही. शिवसेना एकच आहे ती म्हणजे माझ्या समोर बसेलेले तुम्ही.

– दुसरी आनंदाची गोष्ट अशी आहे की इथे अनेक तरुण दिसत आहे. ही तरुणाई शिवसेनेसोबत भक्कमपणे उभी आहे याचा मला खास आनंद आहे.

– आज दोन गोष्टींचा मला आनंद आहे. पहिली गोष्ट म्हणचे सर्वात जास्त महिला इथे उपस्थित आहेत. ही शक्ती महात्त्वाची आहे. कारण त्यांचा उद्धव साहेबांवर जास्त विश्वास आहे. ते कुटुंबप्रमुख आहेत यावर त्यांचा विश्वास आहे.

– आदित्य ठाकरे मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले