LIVE – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भव्य सत्कार सोहळा

1812

शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल असे वचन हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिले होते. शिवसेनाप्रमुखांना दिलेल्या या वचनाची पूर्तता केल्यानिमित्त शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समस्त शिवसैनिकांच्या वतीने भव्य सत्कार केला जात आहे.

 • शिवसैनिकच माझे सुरक्षाकवच आहेत – उद्धव ठाकरे
 • हा सत्कार मी शिवसेनेसाठी लढणाऱ्या, प्राण देणाऱ्यांना समर्पित करत आहे – उद्धव ठाकरे
 • ना आमचा रंग बदलला, ना आमचे अंतरंग बदलले. आमचा रंगही भगवा आहे आणि आमचे अंतरंगही भगवे आहे – उद्धव ठाकरे
 • प्राण गेला तरी मी तुमच्याशी आणि जनतेशी खोटे बोलणार नाही, म्हणून मी हा वेगळा मार्ग स्वीकारला – उद्धव ठाकरे
 • मी नुसता उद्धव ठाकरे नाही तर उद्धव बाळासाहेब आहे – उद्धव ठाकरे
 • ही माझी वचनपूर्ती नाही, तर त्या वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे – उद्धव ठाकरे
 • मैदानात उतरल्यापासून कधीही पळ काढला नाही आणि काढणारही नाही – उद्धव ठाकरे
 • हा माझा सत्कार नाही, तर तुमचा सत्कार आहे – उद्धव ठाकरे
 • युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे यांचा शिवसैनिकांनी केला सत्कार
 • शिवसेनेच्या महिला रणरागिणींनी सौ. रश्मी ठाकरे यांची ओटी भरली आणि त्यांना पुष्पगुच्छ दिला
 • ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते उद्धव ठाकरे यांचा सत्कार
 • शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख, मंत्री आदित्य ठाकरे व्यासपीठावर दाखल

आपली प्रतिक्रिया द्या