LIVE : हिंदुस्थानचा मोठा विजय, कुलभूषण जाधव यांच्या फाशीवर स्थगिती कायम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा आरोप ठेवत फाशीची शिक्षा ठोठावलेले हिंदुस्थानचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना दिलासा मिळाली आहे. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगितीचा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कायम ठेवला आहे. हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अब्दुलकॉवी अहमद युसूफ यांनी हा निर्णय दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुस्थानचा हा मोठा विजय आहे.

  • हिंंदुस्थानचा हा मोठा राजकीय विजय असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली

  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबईमध्ये जाधव यांच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी जल्लोष केला

  • हिंदुस्थानचा हा मोठा विजय – माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज
  • संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले

  • व्हिएन्ना करारानुसार जाधव यांचे राजनैतिक अधिकार कायम राहावे – आंतरराष्ट्रीय न्यायालय
  • पाकिस्तानने सुनावलेल्या सर्व शिक्षांचा पुर्नविचार करावा आणि नव्याने खटला चालवावा – आंतरराष्ट्रीय न्यायालय

  • व्हिएन्ना कराराचे पाकिस्तानकडून उल्लंघन, न्यायालयाने पाकिस्तानला सुनावले
  • 15 विरुद्ध 1 मताने हिंदुस्थानच्या बाजूने निकाल
  • पाकिस्तानचे सर्व युक्तिवाद आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फेटाळले
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिला हिंदुस्थानच्या बाजूने निकाल
  • आंतरराष्ट्रीय न्याय सल्लागार रिमा ओमेर यांनी केले ट्वीट
  • पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेवर स्थगिती आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कायम ठेवली

  • हिंदुस्थानचा विजय, कुलभूषण जाधव यांना कायदेशिर मदत मिळण्याचा मार्ग मोकळा

  • कुटुबींयांची कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रार्थना

  • नेदरलँडमधील हिंदुस्थानचे राजदूत विरू राजामोनी आणि एमईएचे (पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण) संयुक्त सचिव दीपक मित्तल आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले

  • हिंदुस्थानी राजदुतांचे पथक आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहोचले

  • जाधव यांच्या प्रकरणावर आज अंतिम सुनावणी होणार

  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेश पाकिस्तानला दिले
  • जाधव यांच्या वतीने ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
  • जाधव यांच्या शिक्षेविरोधात हिंदुस्थानने आंतरराष्ट्रीय न्यायालयात तक्रार दाखल केली
  • पाकिस्तान लष्कराच्या न्यायालयाने एप्रिल 2017मध्ये पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली
  • अपहरण करून त्यांच्याकडून सक्तीने हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांचा कबुलीजबाब घेतला.
  • कुलभूषण जाधव इराणमध्ये व्यवसायानिमित्त गेले असताना पाकिस्तानी लष्कराने त्यांचे अपहरण केले.