
मध्य रेल्वे प्रशासनाने सर्व लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष राखीव डब्याची व्यवस्था करणार असल्याची घोषणा केली. परंतु, तो डबा पुठे येईल, याची योग्य माहिती दिलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या होणाऱया गैरसोईकडे मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीने बुधवारी मध्य रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. सर्व रेल्वे स्थानकांवर ज्येष्ठांच्या राखीव डब्यासंदर्भात माहिती फलक/ दिशादर्शक फलक लावा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राखीव डब्यात सीसीटीव्ही पॅमेरे बसवा आणि पोलीस तैनात करा, अशी मागणी स्थानीय लोकाधिकार समितीने केली.
लोकल ट्रेनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा विशेष डबा मोटरमन कॅबपासून कितवा असेल, याची माहिती प्रशासनाने दिलेली नाही. यासंदर्भात मध्य रेल्वे स्थानीय लोकाधिकार समितीने मध्य रेल्वेचे जनसंपर्प अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी विविध मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सर्व मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन समितीच्या शिष्टमंडळाला दिले. याप्रसंगी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे संघटन सचिव उमेश नाईक, शैलेश शिंदे, विजय शिरोडकर, संजय माने, शुभम तावडे, अतुल राणे, अनंत पालव, यामिनी भानुशाली, वंदना गवळी, संजय भोईर, अनिता कार्नवाल, अरुण कोष्टी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.