मध्य रेल्वेचा टाईमपास, मालगाडीने बिघडवले लोकलचे वेळापत्रक

सामना ऑनलाईन, मुंबई

अंबरनाथ स्थानकात बराच वेळ मालगाडी रखडल्याने आणि लोकलच्या आधी ही मालगाडी रवाना केल्याने सकाळी सकाळी लोकल वाहतुकीची वाट लागली आहे. मालगाडी अंबरनाथ स्थानकात बराच काळ खोळंबून उभी राहिल्याने अंबरनाथ स्थानकात जवळपास २० मिनिटे मुंबईकडे जाणारी लोकल आलीच नव्हती. कर्जतकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या म्हणजेच अप दिशेच्या फास्ट आणि स्लो गाड्यांच्या वेळापत्रकावर मालगाडीमुळे विपरीत परिणाम झाला असून प्रवाशांना याचा भयंकर त्रास होत आहे. मध्य रेल्वेकडून कोणतीही उद्घोषणा होत नसल्याने अनेक प्रवाशांना कळालंच नाही की नेमकी समस्या काय आहे आणि गाड्या उशिराने का धावत आहेत.