लॉकडाऊनच्या मंदीत मध्य रेल्वेने साधली संधी, 23 ठिकाणांवर पादचारी पुलांच्या कामांचा निपटारा

मध्य रेल्वेने तर लॉकडाऊनचा फायदा घेत जे काम अनेक तासांचे मेगा ब्लॉक घेऊन करावे लागते ते पायाभूत सुविधा उभारण्याचे कार्य या तीन महिन्यांच्या काळात पूर्ण केले आहे. या काळात मध्य रेल्वेने 23 ठिकाणी 14 पादचारी पुलांचे पोलादी गर्डर टाकण्याचे टाकण्याचे काम करतानाच 9 पादचारी पुलांचे सांगाडे हटविण्याचे महत्वपूर्ण काम या लॉकडाऊनमध्ये पूर्ण केले आहे.

कोरोनाने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन घोषीत झाल्यानंतर रेल्वे बंद असली तरी देशभर मालवाहतूक व पार्सल वाहतूकीद्वारे रेल्वेने आपले कार्य निरंतर सुरू ठेवल आहे. मध्य रेल्वेने 23 ठिकाणी महत्वाचे इन्प्रâास्ट्रक्चर वर्क केले आहे. त्यातील 7 ठिकाणे मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या हद्दीत असून 10 ठिकाणे भुसावळ डिव्हीजनच्या हद्दीत तर एक प्रत्येक नागपूर आणि सोलापूरच्या हद्दीत तर तीन पुणे डिव्हीजनच्या हद्दीत मोडत आहेत.

मुंबई डिव्हीजनच्या हद्दीतील कामे…

 – डोंबिवली स्थानकात पादचारी पुलासाठी 6 मीटर रूंदीचा गर्डर लाँच

 – बेलापूर स्थानक परिसरात 3.66 मीटर रूंदीचा गर्डर लाँच

 – वडाळा रोड येथे जुन्या पादचारी पुलांचे दोन स्पॅन हटविले

 – अंबरनाथ आणि आंबिवली प्रत्येकी गंजलेला स्पॅन हटविला

– वासिंद रेल्वे स्थानकात 100 वर्षे जुन्या पुलाचे दोन स्पॅन हटविले

 – आटगाव येथे जुन्या पुलांचे दोन स्पॅन हटविले

आपली प्रतिक्रिया द्या