lok sabha 2019 प्रचार तर होणारच…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
modi-video-speech

सामना प्रतिनिधी । मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘मैं भी चौकीदार’ या अभियानाचे आयोजन मंगळवारी मुंबईतील सात विविध ठिकाणी करण्यात आले होते. यावेळी मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. उत्तर भारतीय संघ सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार आशीष शेलार, उत्तर-मध्य मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन, विलेपार्लेचे आमदार पराग अळवणी आणि भाजप आमदार-उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष आर. एन. सिंह उपस्थित होते. मालाड, अंधेरी, दादर, चेंबूर, मरीन लाइन्स आणि घाटकोपर या ठिकाणीही ‘मैं भी चौकीदार’ अभियान पार पडले.

उत्तर मुंबईतील भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), रासपा महायुतीचे उमेदवार आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे पूर्व येथे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, आमदार विलास पोतनीस, आमदार प्रवीण दरेकर, आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर आदी उपस्थित होते.

उत्तर-पश्चिम लोकसभा क्षेत्रातील गोरेगाव विधानसभा निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन आज शिवसेना नेते-उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि मुंबई भाजपाध्यक्ष आशीष शेलार यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी राज्यमंत्री विद्या ठाकूर, विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अमित साटम, शिवसेना-भाजप नगरसेवक तसेच शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.