Exit poll दिल्लीत आपचा  पुन्हा सुपडा साफ?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकिच्या 7 व्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या न्यूज चॅनल आणि संस्थांचे  एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. या एक्झिट पोलनुसार दिल्लीत 2014 च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आताही आपचा सुपडा साप होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीत आपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे म्हटले आहे. दिल्लीत काँग्रेसला जेमतेम एक जागा मिळू शकते, तर भाजपचे सर्वच्या सर्व 7 उमेदवार दिल्लीत निवडून येऊ शकतात. एनडीटीव्हीनेदेखील सर्व एक्झिट पोलच्या सारांशानुसार तयार केलेल्या ‘पोल ऑफ पोल्स’नेदेखील दिल्लीत पुन्हा भाजपचाच झेंडा फडकणार असल्याचे म्हटले आहे.

इंडिया टीवी-सीएनएक्सच्या एक्झिट पोल नुसारदेखील दिल्लीच्या सर्व जागांवर भाजपचे उमेदवार निवडून येणार असल्याचा अंदाच वर्तविला असून आपचा एकही उमेदवार निवडून येणार नसल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे एबीपी-नीलसनने दिल्लीत भाजपला 5, काँग्रेसला 1 आणि आपलाही 1 जागेवर विजय मिळणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.