पंतप्रधान मोदी प. बंगालमधून निवडणूक लढवणार? अमित शहांनी दिले हे उत्तर

24

सामना ऑनलाईन । कोलकाता

lok sabha election 2019 पंतप्रधान नरेंद्र मोदी प. बंगाल मधून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी उत्तर देताना साफ नकार दिला. या क्षणी असा कुठलाही प्लान नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प. बंगालमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जोरदार ताशेरे ओढले. ममता बॅनर्जी जनतेच्या विरोधात सरकार चालवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. तसेच भाजपच्या नेत्या, कार्यकर्त्यांचा छळ सुरू असून त्यांच्या प्रचारात वारंवार अडचणी आणल्या जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. लोकशाहीची हत्या करणाऱ्या ममता यांना आता लोकशाही आठवली का? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला.

आपली प्रतिक्रिया द्या