
सामना ऑनलाईन । जालना
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी 330597 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेसचे विलास औतडे यांचा पराभव केला.
जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जालना, बदनापूर, भोकरदन, सिल्लोड, फुलंब्री आणि पैठण ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या दोन निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी विजय मिळवला होता.
2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या दानवे रावसाहेब दादाराव यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5,91,428 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक काँग्रेसचे औताडे विलास केशवराव यांना 3,84,630 मतं मिळाली होती.
2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे भाजपच्या दानवे रावसाहेब दादाराव यांनी विजय मिळवला होता. दानवे रावसाहेब दादाराव यांना 3,50,710 मतं मिळाली होती, तर काँग्रेसचे उमेदवार डॉ. कासे कल्याण वैजनाथराव यांना 3,42,228 मतं मिळाली होती.























































