Lok sabha election 2019 : पालघर मतदारसंघाची आकडेवारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पालघर

पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा आणि वसई ही सहा विधानसभा क्षेत्रे येतात. गेल्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला होता.

2014 मध्ये झालेल्या 16 व्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या अॅड. चिंतामण नवशा वनगा यांनी विजय मिळवला होता. त्यांना 5,33,201 मतं मिळाली होती, तर त्यांचे विरोधक बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकुर जाधव यांना 2,93,681 मतं मिळाली होती. दरम्यान, वनगा यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटवनिवडणूक झाली, यात भाजपच्या राजेंद्र गावित यांनी विजय मिळवला होता.

2009 मध्ये झालेल्या 15 व्या लोकसभा निवडणुकीत येथे बहुजन विकास आघाडीचे बळीराम सुकुर जाधव यांनी विजय मिळवला होता. बळीराम सुकुर जाधव यांना 2,23,234 मतं मिळाली होती, तर भाजपच्या अॅड. चिंतामण नवशा वनगा यांना 2,16,674 मतं मिळाली होती.