
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
lok sabha election 2019 साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेशातील हायप्रोफाईल अमेठी ( Amethi ) मतदारसंघात मतदान सुरू आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपच्या उमेदवार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यात रंगदार लढत सुरू आहे. दरम्यान, स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर बुथ कॅप्चरींगचा आरोप केला आहे. यासंदर्भात इराणी यांनी एक व्हिडीओ देखील ट्वीट केला आहे. तसेच निवडणूक आयोग आणि स्थानिक प्रशासनाला याविरोधात कारवाई करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.
हाथ पकड़कर जबरदस्ती पंजा पर धर दिहिन हम देहे जात रहिन कमल पर ( कमल पर देना चाहती थी, जबरदस्ती पंजा पर डलवा दिया)
यह मामला गौरीगंज के गूजरटोला बूथ नंबर 316 का है जहाँ पीठासीन अधिकारी ने जबरदस्ती कांग्रेस को डलवा दिया ।।@smritiirani @ECISVEEP @AmethiDm pic.twitter.com/RR9jv4pUF0
— Chowkidar Vivek Maheshwari (@im_VMaheshwari) May 6, 2019
विवेक माहेश्वर नावाच्या युझरने एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओत वृद्ध महिला म्हणत आहे की, ‘त्यांनी माझा हात पकडला आणि पंजाचे बटण जबरदस्ती दाबले. मला तर कमळाचे बटन दाबायचे होते’. हा प्रकार गौरीगंजच्या गुजरटोला बूथ क्रमांक 316 येथील आहे. इथल्या अधिकाऱ्यांने जबरदस्ती काँग्रेसला मतदान करवले, असा आरोप या ट्वीटमध्ये करण्यात आला आहे. हे ट्वीट स्मृती इराणी, निवडणूक आयोग आणि अमेठीच्या जिल्हाधिकाऱ्यांना टॅग करण्यात आले आहे.
याप्रकरणाची निवडणू आयोगाकडे तक्रार केली असून आयोग आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित आणि कडक कारवाई करावी अशी मागणी स्मृती इराणी यांनी केली आहे. अमेठी या मतदार संघात एकूण 27 उमेदवार मैदानात उतरले आहेत. मात्र खरी लढत राहुल गांधी विरुद्ध स्मृती इराणी यांच्यातच आहे.
Alert @ECISVEEP Congress President @RahulGandhi ensuring booth capturing. https://t.co/KbAgGOrRhI
— Chowkidar Smriti Z Irani (@smritiirani) May 6, 2019



























































