1 / 14
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खेरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाज जलील अशी तिरंगी लढत होणार आहे.
हातकणंगलेमध्ये महायुतीचे युवा उमेदवार धैर्यशील माने आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्यात दुरंगी लढत होणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदूर्गमध्ये महायुतीचे विनायक राऊत, स्वाभिमानचे नीलेश राणे आणि काँग्रेसचे नवीनचंद्र बांदिवडेकर रिंगणात आहेत.
पवारांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या नगर दक्षिण मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप आणि भाजपचे डॉ. सुजय विखे यांच्यात लढत होणार आहे.
सातारा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उदनराजे भोसले आणि महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्यात लढत असणार आहे.
जालना मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, तर काँग्रेसच्या विलास औताडे यांच्याच चुरशीची लढत होणार आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बारामतीमध्ये सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
सांगलीमध्ये महायुतीचे संजय पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील आणि वं.ब. आघाडीचे गो. पडळकर अशी तिरंगी लढत असणार आहे.

























































