
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर शनिवारी प्रचार रॅलीदरम्यान दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली असून त्यांचा डोळा थोडक्यात बचावला आहे. प्रचार रॅली अजित सिंग नगर येथे असताना ही घटना घडली. लोकांचे अभिवादन स्वीकारत असताना गर्दीतून एक दगड मुख्यमंत्री रेड्डी यांच्या दिशेने आला. यावेळी त्यांच्या शेजारी विजयवाडा येथील आमदार वेलमपल्ली श्रीनिवास होते. तेही या हल्लात जखमी झाले.

























































