‘400 पार’चा संकल्प पूर्ण करणे अवघड; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचं पंतप्रधान मोदींना पत्र

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 102 जागांवर शुक्रवारी मतदान पार पडले. दुसरा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल, तिसऱ्या टप्प्यातील 7 मे, चौथ्या टप्प्यातील 13 मे, पाचव्या टप्प्यातील 20 मे, सहाव्या टप्प्यातील 25 मे आणि सातव्या टप्प्यातील 1 जून रोजी होणार असून 4 जून रोजी निकाल लागेल. या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने ‘400 पार’चा नारा दिला आहे. मात्र हा संकल्प पूर्ण करणे अवघड असल्याचे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला वाटत आहे.

उत्तर प्रदेशमधील कानपूर लोकसभा जागेवर चौथ्या टप्प्यात मतदान पार पडणार आहे. या जागेवर भाजपने रमेश अवस्थी हा नवीन चेहरा दिला आहे. मात्र यामुळे भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. तिकीट मिळाल्यापासून रमेश अवस्थी चर्चेत असले तरी त्यांच्या निवडीवरून भाजपमधूनच सवाल उपस्थित होत आहेत. कानपूरमधील भाजपचे माजी उपाध्यक्ष, व्हीएचपीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि बजरंग दलाचे माजी राष्ट्रीय संयोजक प्रकाश शर्मा यांनी या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी 400 पारचा संकल्प पूर्ण करणे अवघड असल्याचे नमूद केले आहे.

प्रकाश शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यात ते म्हणतात, कानपूरची भूमी क्रांतिकारकांची भूमी आहे. या जमिनीवरूनच जनसंघ आणि भाजपचा पाया रचला गेला. मात्र येथून पक्षाने अशा उमेदवाराला मैदानात उतरवले आहे ज्याला कार्यकर्तेही ओळखत नाहीत. रमेश अवस्थी यांनी भाजपचे सदस्यत्व कधी स्वीकारले आणि त्यांचे पक्षासाठी योगदान नक्की काय हे देखील कार्यकर्ते आणि इथल्या नेत्यांना माहिती नाही.

कानपूरची भूमी कार्यकर्ता विरहित झाली आहे का? रमेश अवस्थी यांना तिकीट दिल्यामुळे पक्षाचे कार्यकर्ते निराश झाले असून त्यांची घुसमट होत आहे. असेच चालू राहिले तर मोदीजी तुमच्या 400 पारचा संकल्प अपूर्णच राहील, असे प्रकाश शर्मा यांनी आपल्या पत्रामध्ये म्हटले आहे. या पत्रामुळे कानपूरमध्ये भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

36 कोटींची संपत्ती, पण स्वत:ची कार नाही; व्यवसाय शेती अन् कॅश फक्त 24 हजार, शहांचे प्रतिज्ञापत्र व्हायरल

कोण आहेत प्रकाश शर्मा?

प्रकाश शर्मा यांचा कानपूरच्या दिग्गज नेत्यांमध्ये समावेश होतो. त्यांनी आतापर्यंत भाजप, व्हीएचपी, बजरंग दलामध्ये अनेक मोठ्या पदांवर कार्य केले आहे. शहरासह राज्याच्या राजकारणातही ते सक्रीय असतात. मात्र कानपूर मतदारसंघातून नवख्या उमेदवाराला तिकीट दिल्यामुळे आणि यामुळे भाजपचेच नुकसान होणार असल्याचे सूतोवाच त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)