36 कोटींची संपत्ती, पण स्वत:ची कार नाही; व्यवसाय शेती अन् कॅश फक्त 24 हजार, शहांचे प्रतिज्ञापत्र व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातमधील गांधीनगर या मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहेत. येथे तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान पार पडणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून त्यांच्या प्रतिज्ञापत्राचीच सोशल मीडियावर चर्चा आहे.

अमित शहा यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे स्वत:ची चारचाकी गाडी नाही. व्यवसाय म्हणून ते शेती करतात आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत खासदाकीचे वेतन, घर आणि जमिनीचे भाडे, शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि शेअर्समधून मिळणारे डिव्हीडंड असल्याचे शहा यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. यासह त्यांच्यावर तीन गुन्ह्यांची नोंद असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

प्रतिज्ञापत्रात आहे तरी काय?

1. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे स्वत:ची चारचाकी गाडी नाही
2. त्यांच्याकडे 20 कोटींची चल, तर 16 कोटींची अचल संपत्ती आहे.
3. त्यांच्यावर 15 लाख 77 हजारांचे कर्ज आहे.
4. त्यांच्याकडे फक्त 24 हजार 164 रुपये कॅश आहे.
5. त्यांच्याकडे 72 लाखांचे दागिने असून त्यापैकी फक्त 8 लाख 76 हजारांचे दागिने त्यांनी स्वत: खरेदी केलेले आहेत.
6. शहांच्या पत्नीकडे 1 कोटी 10 लाखांचे दागिने असून यात 1 किलो 620 ग्रॅम सोने आणि 63 कॅरेटच्या हिऱ्यांचा समावेश आहे.
7. शहा यांची 2022-23 या आर्थिक वर्षातील उत्पन्न 75 लाख 9 हजार होते.
8. त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 39 लाख 54 हजार आहे.
9. शहा यांनी आपला व्यवसाय शेती असून सामाजिक कार्यकर्ता असल्याचेही नमूद केले. तसेच त्यांच्या 3 गुन्ह्यांचीही नोंद आहे.
10. त्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत खासदाकीचे वेतन, घर आणि जमिनीचे भाडे, शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि शेअर्समधून मिळणारे डिव्हीडंड आहे.
11. त्यांच्या पत्नीकडे 22 कोटी 46 लाखांची चल, तर 9 कोटींची अचल संपत्ती आहे.
12. शहांच्या पत्नीवर 26 लाख 32 हजारांचे कर्जही आहे.

Lok Sabha Election 2024 : स्मृती इराणींनी अमेठीत केलेली पाच कामे सांगावीत, काँग्रेसचे आव्हान

गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून याआधी भाजपचे दिग्गज नेते, भारतरत्न लालकृष्ण आडवाणी निवडणूक लढत होते. 6 वेळा इथून ते निवडून आले. 2019मध्ये अमित शहा यांनी पहिल्यांदा येथून निवडणूक लढली आणि ते 5 लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते.

दरम्यान, देशातील सर्व 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होत आहे. गुजरातच्या 26 जागांवर तिसऱ्या टप्प्यात एकाचवेळी मतदान होणार आहे. 7 मे रोजी येथे मतदान होणार असून 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)