Lok Sabha Election 2024 : परभणीत उद्या महाविकास आघाडीचा झंझावात, उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा

परभणी लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या निवडणूक प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मंगळवार, 23 एप्रिल रोजी जाहीर सभा होणार आहे. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित राहणार आहेत.

परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या आक्रमक प्रचाराने परभणी जिल्हा ढवळून निघाला आहे. मंगळवार, 23 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता स्टेडियम मैदानावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचीही उपस्थिती राहणार आहे. या सभेस हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.