शेवाळेंच्या अभिनंदनाचा बॅनर उतरवला

मिंधे गटाचे उमेदवार राहुल शेवाळेंच्या अभिनंदनाचा बॅनर काही तासातच उतरवण्याची नामुष्की प्रतीक्षा नगरमधील हौशी समर्थकांवर ओढावली. रविवारी हा बॅनर येथील माला गार्डन येथे लावण्यात आला होता. दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे(उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार अनिल देसाई व मिंधे गटाचे राहुल शेवाळे यांच्यात लढत झाली. शेवाळेंच्या अति उत्साही समर्थकांनी मतमोजणीच्या दोन दिवस आधीच अभिनंदनाचा बॅनर लावला. नंतर हा बॅनर काढण्यात आला. शिवसेनेचे उमेदवार अनिल देसाई यांनी शेवाळे यांच्यावर मात करत दणक्यात विजय मिळवला.