
लोकसभा निवडणुकीचा 2024 बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा केली असून एकूण सात टप्प्यांमध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. लोकसभेच्या एकूण 543 जागांसाठी निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने घोषणा करताच देशात आचारसंहिता लागू झाली आहे.
पहिल्या टप्प्याचे मतदान 19 एप्रिलला होणार असून शेवटच्या म्हणजे सातव्या टप्प्यात 1 जूनला मतदान होणार आहे. तर देशभरात 4 जून रोजी मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यांत मतदान होणार आहे. 4 जूनला मतमोजणी लोकसभा निवडणुकीसह चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही होणार आहेत.
असे आहेत लोकसभा निवडणुकीचे 7 टप्पे
पहिला टप्पा – 21 राज्यांत 101 जागांसाठी19 एप्रलिला मतदान
दुसरा टप्पा – 13 राज्यांत 89 जागांसाठी 26 एप्रिलला मतदान
तिसरा टप्पा – 12 राज्यांत 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान
चौथा टप्पा -10 राज्यांत 96 जागांसाठी 13 मे रोजी मतदान
पाचवा टप्पा – 8 राज्यांत 49 जागांसाठी 20 मे रोजी मतदान
सहावा टप्पा – 7 राज्यांत 57 जागांसाठी 25 मे रोजी मतदान
सातवा टप्पा – 8 राज्यांत 57 जागांसाठी 1 जूनला मतदान
























































