आज 20 मे रोजी लोकसभा निवडणुक 2024 चा पाचव्या टप्प्यातील मतदान असून मुंबईतल्या सर्व सहा मतदारसंघांसह भिवंडी, नाशिक, दिंडोरी, धुळे, पालघर या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात वाजल्यापासून नागरिकांनी मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर कलाकारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावत सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर करत चाहत्यांनाही मतदान करण्याचे आवाहन केले आहे.