विल्यम्सनने रचला इतिहास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यम्सनने यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत इतिहास रचला. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडसाठी संकटमोचक ठरलेला केन विल्यम्सन वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार ठरला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या किताबी लढतीत त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने 548 धावांचा विक्रम रविवारी मोडला. जयवर्धनेने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये कर्णधार या नात्याने श्रीलंकेसाठी 548 धावांचा विक्रम केला होता. मात्र केन विल्यम्सनने यंदा जयवर्धनेचा विक्रम मोडताना 578 धावा फटकाविल्या.