
लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात हद्दीत घरफोडीत चोरट्यांनी पाच लाख रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. कोरेगावजवळी काकडे वस्ती येथे राहणारे शुभम कोंडीबा बधे (वय – 23) यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाख 57 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला.
बधे शनिवारी दुपारी घर बंद करून बाहेर गेले होते. दुपारी एक ते तीन दरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घरातील 64 ग्रॅम सोने व रोख रक्कम असा दोन लाख 54 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्याशिवाय घराशेजारी राहणारे चंद्रकांत काकडे यांनी घराचा कडी-कोयंडा उचकटून आत प्रवेश केला. त्यांच्या घरातून दीड हजार रूपये चोरले. सोनू श्रीवास्तव यांच्या घरात प्रवेश करून दीड हजार रूपयांची रोकड चोरल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कदमवाक वस्ती येथील थंड पेयाच्या गोडावूनमधून 2 लाख 67 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वैभव सतीश खंडेलवाल (वय – 38) यांनी तक्रार दिली आहे. कदमवाक वस्ती येथे तक्रारदार यांचे कोल्ड्रींग व एनर्जी ड्रींकचे गोडावून आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता गोडावून बंद केल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी एनर्जी ड्रींकचे 285 बॉक्स चोरून नेले.




























































