
लोणी काळभोर आणि विश्रांतवाडी परीसरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर सामाजिक सुरक्षा विभागो छापा टाकून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून 78 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. लोणी काळभोर परीसरात मटका जुगार सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने अड्ड्यावर छापा टाकून 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोकड, मोबाईल मटका जुगाराचे साहित्य असा 46 हजारांचा ऐवज जप्त केला.
विश्रांतवाडीतील जुगार अड्डयावर छापा टाकून पथकाने 10 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 32 हजारांचा ऐवज जप्त केला. दोन्ही कारवाईत 20 जणांविरूद्ध कारवाई करण्यात आली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,विजय कुंभार, एपीआय अश्विनी पाटील, एपीआय अनिकेत पोटे, राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित जमदाडे यांनी केली.



























































