लव्ह जिहाद : अल्पवयीन हिंदू मुलीस पळवणारा पोलिसांना शरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चाकूर

तालुक्यातील आंबेवाडी येथील हिंदू अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेणारा अखेर मुलीसह चाकूर पोलीस ठाण्यात हजर झाला. मोटारसायकलवरुन पळवून आणल्यानंतर थेट त्यांनी मुंबई गाठली होती. या प्रकरणी तिघांवर चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

चाकूर तालूक्यातील आंबेवाडी येथील येथील अल्पवयीन हिंदू मुलीस मुस्लीम समाजातील युवकाने ६ जुलै रोजी पळवले होते. मोटारसायकलवरुन पळवून नेल्यानंतर त्यांनी थेट मुंबई गाठली होती. दरम्यान पोलीसांनी या प्रकरणी मुलीस पळवून घेऊन जाणारा जुबेर अमिनसाब मुंजेवार (१७), त्याचे साथीदार रहिम पटेल रा. चाकूर, मंगेश जांबळे रा. खरोळा यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केलेला होता.

चौकशीसाठी पोलीसांनी मुलाच्या वडीलांना ताब्यात घेतले आणि जुबेर अमिनसाब मुंजेवार हा मुंबईवरुन मुलीसह चाकूर पोलीस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी मुलीचा जबाब चाकूर पोलीस ठाण्यात घेण्यात येत आहे. जुबेर याचा साथीदार रहिम पटेल यालाही पोलीसांनी ताब्यात घेतलेले आहे.

शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन हिंदू मुलीस पळवून घेऊन जाणाऱ्या तरुणांना तत्काळ अटक करण्याची मागणी केलेली होती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबंधित मुलीच्या कुटंबियांना भेटून आधार देण्याचे आदेश दिले होते. घरातुपन पळून जाताना मुलीने घरातील २५ हजार रुपये आणि ५ तोळे सोनेही नेले असल्याचे कुटूंबियांनी सांगीतले.