
गुजरातमधील अहमदाबाद शहरात राहणाऱ्या एका घटस्फोटित महिलेने अनैतिक संबंध तोडले म्हणून तिच्या बॉयफ्रेंडने त्याच्या खासगी क्षणांचे फोटो तिच्या मुलांना पाठवले आहेत. या महिलेने तिच्या बॉयफ्रेंडविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सदर महिला व तिची दोन मुलं ही शहरातील आंबेवाडी येथे राहतात. या महिलेचा पंधरा वर्षापूर्वीच तिच्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. या महिलेचे गेल्या वर्षी तिच्याच ऑफिसमध्ये कामाला असलेल्या मितेश परमार या तरुणासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र काही महिन्यातच महिलेला आपल्या मुलांना याबाबत समजले तर काय होईल या विचाराने अस्वस्थ झाले. त्यामुळे तिने त्या मितेशसोबतचे संबंध तोडले. मात्र त्यामुळे मितेश वैतागला. त्याने अनेकदा त्या महिलेला समजवायचा प्रयत्न केला. मात्र ती पुन्हा संबंध ठेवण्यास तयार झाली नाही.
दरम्यान त्यांचे संबंध असताना मितेशने त्यांच्यातील खासगी क्षणांचे तिच्या नकळत चित्रीकरण केले होते. ते फोटो व व्हिडीओ त्याने त्या महिलेच्या मुलांना पाठवले. त्यामुळे त्या महिलेने मितेश विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

























































