सेटवर परतल्याचा आनंद

561

तब्बल तीन महिन्याच्या गॅपनंतर सोनी सबवरील ‘मॅडम सर’ या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहे. यात इन्स्पेक्टर हसीना मल्लिक हे पात्र साकारणारी अभिनेत्री गुल्की जोशी सेटवर पुन्हा परतल्याने आनंदात आहे. याबाबत गुल्की म्हणाली, ‘‘सेटवर परतल्याने खूपच आनंद झाला आहे. सेटवर मोजकेच लोक आहेत. पण घरी परतल्यासारखे वाटत आहे. सेटवर आमच्या आरोग्यासाठी सुरक्षिततेचे विविध उपाय राबवले आहेत. आम्ही लवकरच आमच्या प्रेक्षकांसाठी नवीन एपिसोड्स घेऊन येण्यासाठी उत्सुक आहोत.’’ मॅडम सर या मालिकेत चार महिला पोलिसांची गोष्ट असून यात गुल्कीसह युक्ती कपूर, भाविका शर्मा आणि सोनाली नाईक यांच्या भूमिका आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या