सिंगापूरच्या मादाम तूसादमध्ये श्रीदेवीचा मेणाचा पुतळा

423
श्रीदेवी.. बॉलिवूडवर आपली छाप सोडून जाणारी एक सुपरस्टार अभिनेत्री. 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचं दुबई येथे निधन झालं. मात्र, त्या पुन्हा एकदा एका वेगळ्या रुपात अवतरल्या आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवीला आज तिच्या जयंतीनिमित्त आगळ्यावेगळ्या शैलीत श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. श्रीदेवीच्या जयंतीनिमित्त सिंगापूरच्या मादाम तूसाद संग्रहालयाने श्रीदेवीच्या मेणाच्या पुतळ्याच्या अनावरणाची घोषणा केली आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर तिच्या स्मृतीसाठी हा मेणाचा पुतळा उभारण्यात आला आहे.

श्रीदेवीच्या कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर श्रीदेवीच्या पोज, एक्सप्रेशन, मेकअप यांचा विचार करून 20 तज्ज्ञांच्या पथकाने पाच महिने मेहनत घेऊन हा पुतळा तयार केला आहे. हे काम आव्हानात्मक असल्याचे या पथकाने सांगितले. श्रीदेवीचा क्राऊन, कफ्स, ईयरिंग आणि ड्रेसमधील 3 डी प्रिंटचा सखोल अभ्यास केल्यानंतर हा पुतळा तयार करण्यात आला आहे. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील हवाहवाई गाण्यात श्रीदेवीच्या लूकप्रमाणे हा पुतळा बनवण्यात आला आहे. या गाण्यातील श्रीदेवीच्या लूकप्रमाणे ड्रेसअप, क्राऊन, मेकअप, हेअरस्टाइल हुबेहुब साकारण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्यात बोनी कपूर, जान्हवी आणि खूशी कपूर यांच्याहस्ते श्रीदेवीच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. श्रीदेवीचा पुतळा सिंगापूरच्या मादाम तूसाद संग्रहालयात साकारून त्यांचा सन्मान केल्याने आनंद झाल्याचे बोनी कपूर यांनी सांगितले आहे. श्रीदेवी हिंदुस्थानी सिनेमाच्या आयकॉन आहेत. त्यांच्या पुतळ्याशिवाय हे संग्रहालय अपूर्ण होते. आता त्यांच्या पुतळ्याचे लवकरच अनावरण होणार असल्याचे सांगत संग्रहालयाचे व्यवस्थापक एलेक्स वॉर्डन यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या