मढच्या समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मढच्या समुद्रात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. कयूम शेख असे त्याचे नाव असून घडल्याप्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. कयूम हा मालवणीच्या कलेक्टर कंपाऊंड येथे राहत होता. रविवारी सायंकाळी कयूम हा त्याच्या तीन मित्रांसोबत मढ येथील समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. सायंकाळी आलेल्या समुद्राच्या भरतीमुळे कयूमला पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. पोहण्यासाठी गेलेला कयूम पाण्यातून बाहेर न आल्याने त्याच्या मित्रांनी पुन्हा समुद्रात धाव घेतली. लाईफ गार्डच्या मदतीने कयूमला पाण्यातून बाहेर काढून त्याला रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.