माढा आमदार डॉ. तानाजी सावंत यांना ठार मारण्याची पत्राद्वारे धमकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माढा

शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजी राव सावंत यांना एका अज्ञात व्यक्तीने निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे बंधू जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या वृत्ताने शिवसैनिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

वाकाव, ता. माढा येथे जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजी सावंत यांच्या निवासस्थानी पोष्टाकडून पत्र मिळाले. त्यात पूर्व वैमनस्यातून तानाजीराव सावंत यांना ठार मारण्याची योजना आखली आहे, असा धमकीवजा मजकूर असल्याने त्यांचे बंधू प्रा. शिवाजी सावंत यांनी माढा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत