माधुरीने अनोख्या अंदाजात दिल्या डॉ. नेनेंना शुभेच्छा

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांच्या लग्नाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने आयुष्यात तुम्हाला मिळवून मी खूप आनंदी आहे, असे म्हणत माधुरीने पती डॉ. श्रीराम नेने यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर माधुरीने पतीसोबतचे आधीचे आणि आताचे असे दोन फोटो शेयर केले आहेत. पोस्टमध्ये माधुरीने लिहिलंय, ‘माझ्या स्वप्नातल्या माणसासोबत आजपासून आणखी एका नव्या वर्षाची सुरुवात. आपण खूप वेगळे असलो तरीही आपण एकसारखे आहोत. आयुष्यात तुम्हाला मिळवून मी खूप आनंदी आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राम.’

आपली प्रतिक्रिया द्या