
प्रसिद्ध नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाटय़-चित्रपट निर्माते दिवंगत मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून येत्या 19 ते 22 मार्च या कालावधीत तीन दिवसांचा विशेष नाटय़ महोत्सव श्री शिवाजी नाटय़ मंदिर, दादर येथे आयोजित करण्यात आला आहे.
नाटय़ महोत्सवात 19 मार्च रोजी ‘दिवा जळू दे सारी रात’(19 मार्च), 20 मार्च रोजी ‘डार्लिंग डार्लिंग’, 21 मार्च रोजी ‘नाथ हा माझा’ या नाटकांचे सादरीकरण होईल. या नाटकांच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे. नाटय़ महोत्सव आणि सांगीतिक मैफल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना हा महोत्सव अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या भावना मुलगा अनिल कालेलकर यांनी व्यक्त केल्या.
कालेलकर यांनी आपल्या कारकीर्दीत 110 हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन केले. 70 पेक्षा जास्त चित्रपट गीते लिहिली. 30 पेक्षा जास्त नाटके लिहिली तसेच पाच नाटकांची निर्मिती केली.



























































