धक्कादायक! एकाच सुईने 40 मुलांचे लसीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेशमध्ये कोरोना लसीकरणादरम्यान आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी बुधवारी एका नर्सिंगच्या विद्यार्थ्याला जैन पब्लिक स्कूलमध्ये मुलांच्या लसीकरणासाठी पाठवले होते.

या विद्यार्थ्याने एकाच सुईने तब्बल 40 मुलांचे लसीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अधिकाऱयांनी एकच सुई दिली होती आणि यानेच सर्व मुलांचे लसीकरण करण्याच्या सूचना दिल्या होत्या अशी माहिती या विद्यार्थ्याने दिली. याप्रकरणी जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. एस. आर. रोशन यांना निलंबित केले आहे.