हजारो नकार, पण एका व्हिडीओने बदलले नशीब’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ती रोज नोकरीसाठी आपला रिझ्यूम अपडेट करायची, पण हजारो कंपन्यांकडून तिला नकारच मिळायचा. अखेर कंटाळून तिने तिचे शिक्षण, ती काय करू शकते, तिच्या क्षमता काय आहेत हे अतिशय खुबीने सांगणारा 1 मिनीट 42 सेकंदांचा व्हिडीओ लिंकेडिन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केला आणि तिला 100 कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर्स येऊ लागल्या, पण एखाद्या उत्पादनाचे मार्केटिंग किंवा ब्रॅंडिंग करण्याची आपल्यातील क्षमता तिने ओळखली आणि सर्व कंपन्यांना नकार देत स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

नोकरी मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱया हजारो तरुणांपैकी माद्रिद येथील सध्याची मार्केटिंग मॅनेजर मार्टा पुरेटो ही एक होती. कंपन्यांकडून सातत्याने नकार मिळत असल्याने ती प्रचंड निराश झाली होती, परंतु स्वतःचेच ब्रँडिंग करणारा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर अपलोड केला आणि तिचे नशीब पालटले. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. तिला 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाल्या आणि त्या वाढतच गेल्या.