हम साथ साथ है! विधानाचा विपर्यास केल्याचा अशोक चव्हाण यांचा खुलासा

819

महाविकास आघाडीमधील तीन पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाबाबत मी वक्तव्य केले. पण ज्या बातम्या आल्या त्या वस्तुस्थितीला धरून नाहीत. आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज आपल्या विधानाबाबत केला.

अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे प्रसिद्धीमाध्यमांतून जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी आज स्पष्टीकरण दिले. तीनही पक्षांनी एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तावेज आहे. त्या अनुषंगानेच मी बोललो. पण ज्या बातम्या आल्या त्या वस्तुस्थितीला धरून नाहीत. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. त्यांच्या या खुलाशाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही पाठिंबा दिला. अशोक चव्हाण यांच्या विधानाचा विपर्यास झाला असून आम्ही ठरवले त्यानुसारच पुढे जाऊ. सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावरच चालेल असे स्पष्ट केले आहे. राष्ट्रपती राजवटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटते हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हे सरकारच कायम राहू नये असेही त्यांना वाटत असेल; पण हे त्यांचे स्वप्न मुंगेरीलाल के हसीन सपनेसारखे आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या