शिंदे कमिटी बरखास्त करून जातनिहाय सर्वेक्षण करण्याची मागणी – महादेव जानकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही ज्यावेळेस राज्यात मराठ्यांची 57 मोर्चे निघाले त्यावेळेस आम्ही त्यांना मदत केली आहे. मात्र सध्याची स्थिती पाहता ओबीसी मधील गोरगरिबांवरती अन्याय होऊ नये या भूमिकेत आम्ही आहोत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मिळाला त्याला आम्ही समर्थन देत असल्याचं महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. ओबीसी मधील किंवा इतर जातीमधील अनेक समाजांना आजपर्यंत आरक्षण मिळाले नाही, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये अशी आमची मागणी आहे. सर्व समाजाचा जात निहाय सर्वेक्षण करावे आणि याआधी शिंदे कमिटी बरखास्त करण्याची मागणी ही महादेव जानकर यांनी केली आहे.

पंकजा मुंडे या मार्स लीडर त्यांना कोणी संपू शकत नाही – महादेव जानकर

भाजपमधून पंकजा मुंडे यांना डावलले जात असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे. त्यातच पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या साखर कारखान्यावर कारवाईनंतर या चर्चेंना उदंड आला आहे पंकजा मुंडे यांना जाणीवपूर्वक काढलं जात असल्याचा आरोपही होत आहे. यावर बोलताना समाजवादी पक्षाचे नेते महादेव जानकर पंकजा मुंडे या मास लीडर आहेत त्यांना कोणीही संपवू शकत नाही. त्या स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांना संघर्ष नवीन नाही. त्या खंबीरपणे उभ्या आहेत. त्यामुळे त्यांना संपवण्याचा विषय येत नाही, असं जानकर म्हणाले.

गायकवाड गोळीबार प्रकरणी फडणवीसांचा राजीनामा…जानकर म्हणाले, ही स्टाईल झालीय

शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्येच हा गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागले आहे. यावर बोलताना राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर म्हणाले, हे कृत्य योग्य नाही. गोळीबार झालेल्या प्रकरणावरती महादेव जानकर म्हणाले की हे योग्य नाही. सत्ता कोणाचीही असो आमदार खासदारांना काही प्रोटोकॉल असतात. मात्र त्यांनी ते पाळावेत या या घटनेचा मी समर्थन करणार नाही. प्रजा हीच राजा आहे. तेच आम्हाला लोकप्रतिनिधी बनवतात. कोणत्याही आमदार खासदार तसेच मंत्र्यांनी असे आघोरी कृत्य करू नये, असे यावेळी बोलताना महादेव जानकर म्हणाले. तसेच कोणाचा राजीनामा मागणं हे आता केवळ एक स्टाईल झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी बोलताना जानकर म्हणाले.