सीमेवरील जवानांना महानंद पुरवणार 36 लाख लिटर दूध

571
milk-1

देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर दिवस-रात्र पहारा देणाऱ्या जवानांना महानंद डेअरी तब्बल 36 लाख लिटर टेट्रापॅकिंगचे दूध पुरवणार आहे. इस्टर्न आणि नॉर्दन कमांडच्या जवानांना सकस आणि उच्च प्रतिचे दूध पुरवण्यासाठी संरक्षण विभागाने टेंडर काढले होते. त्यानुसार महानंद डेअरीला इस्टर्न कमांडला 14 लाख तर नॉर्दन कमांडला 21 लाख 50 हजार लिटर दूध पुरवण्याचे टेंडर मिळाले आहे. या दुधाचा दर सुमारे 64 रुपये 50 पैसे प्रतिलिटर एवढा असल्याने डेअरीला  वर्षभरात तब्बल 21 कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

जवानांसाठी संरक्षण विभाग जास्त काळ टिकणाऱ्या टेट्रपॅकच्या दुधाची खरेदी करते. त्यानुसार 10 ऑक्टोबरपासून सप्टेबर 2020 या कालावधीसाठी टेट्रापॅकींच्या दुधाची खरेदी करण्यासाठी नुकतेच टेंडर मागवले होते. त्यात इस्टर्न कमांडच्या लिकाबली, केएम-06 आणि रंगीचा या डेपोंना तर नॉर्दन कमांडच्या जम्मू परिसरातील डेपोंना दूध पुरवण्याबाबत प्रस्ताव दिला होता. महानंदच्या दुधाची गुणवत्ता चांगली असून सहा महिन्यांपर्यंत टिकते. त्यामुळे त्यास संबंधित विभागाने दूध खरेदीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे वर्षभरात 36 लाख लिटर दुधाच्या पुरवठ्यातून डेअरीला सुमारे 21 कोटी रुपये मिळणार आहेत. मागील वर्षी महानंदने इस्टर्न कमांडला केवळ 11 लाख लिटर एवढ्या दुधाचा पुरवठा केला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या