
अमूल आणि गोकुळनंतर आता महानंद डेअरीनेही आपल्या दुधाच्या दरात दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता प्रतिलिटर गाईच्या दुधासाठी 56 रुपये मोजावे लागणार आहेत. आधीच महागाईचे चटके सोसणाऱया सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दुधाच्या खरेदी दरात वाढ झाल्याने महानंद डेअरीनेही शेतकऱयांकडून खरेदी केल्या जाणाऱया प्रतिलिटर दुधाचा दर 36 रुपयांवरून 37 रुपये केला आहे. तसेच दुधाच्या पाऊच पॅकिंग खर्चातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विक्री दरात वाढ केल्याचे महानंद डेअरीने स्पष्ट केले आहे.
शिवजन्मोत्सव सोहळय़ासाठी उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांना निमंत्रित केले जाईल, अशी माहितीही लोढा यांनी दिली. येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. यंदा शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे होत आहेत. तसेच यंदाचे वर्ष हे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे शिवराज्याभिषेक सोहळाही मोठय़ा उत्साहात साजरा केला जाईल, असे लोढा यांनी सांगितले.

























































