कोरोनाविषयक माहिती आता एका क्लिकवर, ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित

राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन राबवित असलेल्या विविध उपाययोजनांसह यासंदर्भातील निर्णय, योजना, उपक्रम आणि आकडेवारीची माहिती जनतेला आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘महासंवाद’ वेबपोर्टलवर ‘लढा कोरोनाशी’ हे सदर कार्यान्वित करण्यात आले आहे.

कोरोना महामारीसारख्या आपत्तीच्या काळात जनतेला वस्तुनिष्ठ आणि अधिकृत माहिती मिळण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘लढा कोरोनाशी’ हे नवीन सदर सुरु केले आहे. या सदरांतर्गत कोरोनासंदर्भात राज्य शासनाने घेतलेले निर्णय, राज्य आणि जिल्हास्तरीय बातम्या, लेख, दैनंदिन अहवाल एकत्रितरित्या बघता येणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या