राज्यात एकाच दिवसात, 12 हजार 326 कोरोनामुक्त!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांचा उच्चांक गाठला असून दिवसभरात 12 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 7760 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यभरात 2 लाख 99 हजार 356 रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण 65.37 टक्के आहे. सध्या 1 लाख 42 हजार 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनाही कोरोना

दिवसभरात 300 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून मृत्यूदर 3.52 टक्के आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबई मनपा-56, ठाणे- 6, ठाणे मनपा-7, नवी मुंबई मनपा-7, कल्याण डोंबिवली मनपा-6, उल्हासनगर मनपा-1, भिवंडी निजामपूर मनपा-16, मीरा भाईंदर मनपा-8,पालघर-1, वसई-विरार मनपा-4, रायगड-6, नाशिक-4, नाशिक मनपा-5.

मुंबईत 709 नवे रुग्ण, 56 जणांचा मृत्यू
मुंबईत आज कोरोनाचे 709 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 56 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 873 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या आता 90 हजार 962 वर पोहोचली आहे. मुंबईत 56 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 6 हजार 546 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग वाढून 80 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या आता 20 हजार 326 इतकी आहे. मुंबईत कोरोनाच्या आतापर्यंत 5 लाख 59 हजार 787 चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 1 लाख 18,130 वर पोहोचली आहे.