राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट, 24 तासांत 1410 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा आलेख हळहळू खाली येताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 1,410 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील 1,520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यातील मृत्यूदरातही सातत्याने घट होत असून तो 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आज 23,894 इतकी ऑक्टिव्ह रुग्णसंख्या आहे.

मुंबईत 408 कोरोना रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासांत 408 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 531 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,30,714 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर गेला आहे. गेल्या 24 तासात सहा जणांचा मृत्यू झाला.