राज्यातील 26 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, सचिन कुर्वे मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

सामान्य प्रशासनाने मंगळकारी 26 सनदी अधिकाऱयांच्या घाऊक बदल्या केल्या आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची मुंबईच्या कामगार आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. रामास्वामी यांच्या बदलीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तपद ए. बी. मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात सचिवपदी करण्यात आली आहे. मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरीकर यांना देण्यात आली आहे.

मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी शिवाजी दौंड यांना कोकण किभागीय आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईचे कामगार आयुक्त आर. आर. जाधव यांची मत्स्य विभागाच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे. मुंबई म्हाडाचे मुख्य अधिकारी डी. एस. कुशवाह यांची मेरीटाइम बोर्डाच्या मुख्य कार्यकारीपदी तर पालघरचे जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांची सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

अधिकाऱयांच्या बदल्यांचे ठिकाण पुढीलप्रमाणे
– अजित पाटील – व्यवस्थापकीय संचालक, माहिती-तंत्रज्ञान
– राधाकृष्णन बी. – मुख्य कार्यकारी अधिकारी, म्हाडा, मुंबई
– बालाजी मंजुळे – आयुक्त, आदिवासी संशोधन संस्था, पुणे
– डॉ. नरेश गीते – जिल्हाधिकारी, भंडारा
– राहुल रेखावार – सहव्यवस्थापकीय संचालक, महाडिस्कोम, संभाजीनगर
– शंतनु गोयल – अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
– एम. जे. प्रदीप चंद्रन – अतिरिक्त विभागीय आयुक्त नाशिक
– राजेंद्र भारुड – जिल्हाधिकारी, नंदुरबार
– डी. गंगाथरन – जिल्हाधिकारी, धुळे
– कैलास शिंदे – जिल्हाधिकारी पालघर
– अमोल एडगे – माहिती-तंत्रज्ञान संचालक
– भुकनेश्वरी एस. – मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद
– कनमाथी सी. – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे
– अजित कुंभार – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर
– योगेश कुंभेजकर – सहाय्यक जिल्हाधिकारी, प्रकल्प अधिकारी अमरावती
– पी.टी. वायचाळ – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
– एस.एम. भागवत – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
– यू.ए. जाधव – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे