
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज वरळी येथून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला. याआधी शिवसैनिकांनी आदित्य ठाकरे यांचे वरळीत जोरदार स्वागत केले. विविध वाद्य, फुलाचे हार, तसेच ठिकठिकाणी त्यांच्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद, आदित्य ठाकरे झिंदाबाद अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. लोअर परळ येथील शिवालय शाखेपासून सुरू झालेली ही भव्य रॅली पाहण्यासाठी या भागातील जनता, शिवसैनिक रस्त्यावर जमले होते. दोन्हीबाजूंना तुफान गर्दी होती. लोक आदित्या ठाकरेंना आशीर्वाद देत होते. तब्बल तासभर चाललेल्या या भव्य रॅलीनंतर आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पोहोचले.
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे आणि सौ. रश्मीताई ठाकरे यांच्या उपस्थितीत आज वरळी, मुंबई येथे शिवसेना-भाजपा-आरपीआय महायुतीचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार युवासेनाप्रमुख श्री. @AUThackeray यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. pic.twitter.com/IHctMWxbqv
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) October 3, 2019
अर्ज भरण्याची प्रकिया सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मीताई ठाकरे, तेजस ठाकरे असे सर्व ठाकरे कुटुंबीय देखील उपस्थित होते.
विधानसभा 2019 साठीचा अर्ज भरल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ‘महाष्ट्रात जनआशीर्वाद यात्रेत आणि आज जो प्रतिसाद मिळाला, ते बघता मला नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी नक्कीच साथ मिळेल हेच स्पष्ट होत आहे. तुमचे सर्वांचे आशीर्वाद, शुभेच्छा आणि साथ मला अशीच लाभू द्या’, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिली.

























































