
सामना प्रतिनिधी, मुंबई
युवा पिढीला नशेच्या विळख्यात ओढणाऱया हुक्का पार्लरवर महाराष्ट्रात संपूर्णपणे बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने जारी केली आहे. हुक्का पार्लरवरच्या बंदीच्या अध्यादेशावर राष्ट्रपतींनी सही केल्याने आता हुक्का पार्लरना टाळे लागणार आहेत. हुक्का पार्लर सुरू ठेवल्यास तीन वर्षांपर्यंतची कैद व एक लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारण्यात येईल. एका प्राथमिक अंदाजानुसार मुंबईत चारशेहून अधिक हुक्का पार्लर सुरू होती, पण आता हुक्का पार्लरना गाशा गुंडाळावा लागणार आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हुक्का पार्लरचे पेव फुटले आहे. वेगवेगळय़ा फ्लेव्हर्सच्या नावाखाली हुक्का ओढला जात होता. तरुण पिढी हुक्क्याच्या आहारी गेली होती. यामुळे युवा पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. केवळ श्रीमंतांचीच नव्हे, तर मध्यमवर्गीयांची मुले व मुलीही हुक्क्याच्या आहारी गेल्या होत्या. त्यामुळे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हुक्का पार्लर सुरू आहेत.
कमला मिलमधील आगीची घटना
कमला मिलमधील आगीच्या नंतर मात्र हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी तीक्र झाली. कारण डिसेंबर 2017 मध्ये कमला मिलमधील ‘मोजोस बिस्रो’ व ‘वन अबाव्ह’ला रेस्टो पबला आग लागून त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला होता. हुक्का पार्लरमधील हुक्क्याच्या कोळशाच्या ठिणग्यांनी आग लागल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
साध्या सिगारेटपेक्षा तंबाखूचा हुक्का शंभर पटीने घातक आहे. चारकोल (कोळसा) जाळून फ्लेवरवाला हुक्का करतात. त्यात कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असते. ते आरोग्याला अतिशय घातक आहे. त्याने फुप्फुसालालाही धोका निर्माण होते. या बंदीचे स्वागतच आहे.
-डॉ. कैलाश शर्मा, संचालक (अकॅडमिक) टाटा मेमोरिअल रुग्णालय
महाराष्ट्र दुसरे राज्य
हुक्का पार्लरवर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य आहे. यापूर्वी गुजरातमध्ये हुक्का पार्लरवर बंदी घालण्यात आली आहे.
शिक्षेची तरतूद
हुक्का पार्लर चालवल्यास एक ते तीन वर्षांची कारावासाची शिक्षा व पन्नास हजार ते एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल. आहारी गेली होती. यामुळे युवा पिढीच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. केवळ श्रीमंतांचीच नव्हे, तर मध्यमवर्गीयांची मुले व मुलीही हुक्क्याच्या आहारी गेल्या होत्या. त्यामुळे हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली होती. केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात हुक्का पार्लर सुरू आहेत.
कमला मिलमधील आगीची घटना
कमला मिलमधील आगीच्या नंतर मात्र हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची मागणी तीक्र झाली. कारण डिसेंबर 2017 मध्ये कमला मिलमधील ‘मोजोस बिस्रो’ व ‘वन अबाव्ह’ला रेस्टो पबला आग लागून त्यात चौदा जणांचा मृत्यू झाला होता. हुक्का पार्लरमधील हुक्क्याच्या कोळशाच्या ठिणग्यांनी आग लागल्याचे तपासात स्पष्ट झाले होते. त्यानंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती.
साध्या सिगारेटपेक्षा तंबाखूचा हुक्का शंभर पटीने घातक आहे. चारकोल (कोळसा) जाळून फ्लेवरवाला हुक्का करतात. त्यात कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असते. ते आरोग्याला अतिशय घातक आहे. त्याने फुप्फुसालालाही धोका निर्माण होते. या बंदीचे स्वागतच आहे.
-डॉ. कैलाश शर्मा, संचालक (अकॅडमिक) टाटा मेमोरिअल रुग्णालय
पोलिसांना अधिकार
हुक्का पार्लरवर कारवाईचे अधिकार पोलिसांना दिले असून हुक्का पार्लरवर धाड घालून साहित्य जप्त करण्यात येतील.
विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी
हुक्का पार्लरवर बंदी घालण्याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आले होते. त्यावर गुरुवारी राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे.
summary- maharashtra ban hukka parlors





























































