
राज्यात दिवभरात कोरोनाचे 18 हजार 105 नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर 13 हजार 988 रुग्ण बरे झाले. आतापर्यंत एकूण 6 लाख 12 हजार 484 रुग्ण बरे झाले असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72.58 टक्के आहे. सध्या 2 लाख 05 हजार 428 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात गुरूवारी 391 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.3 टक्के एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 43 लाख 72 हजार 697 नमुन्यांपैकी 8 लाख 43 हजार 844 नमुने पॉझिटिव्ह (19.29 टक्के) आले आहेत. राज्यात 14 लाख 27 हजार 316 लोक होम क्कारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 745 लोक संस्थात्मक क्कारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत 1,526 कोरोना रुग्ण
मुंबईत गुरूवारी दिवसभरात 1,526 कोरोना रुग्ण सापडले असून गेल्या 24 तासांत 859 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 1 लाख 20,561 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 37 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत 37 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 7 हजार 761 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 80 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवसांवर पोहोचला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या आता 21 हजार 442 इतकी आहे. आतापर्यंत 7 लाख 92 हजार 785 चाचण्या झाल्या आहेत.





























































